Thursday, June 5, 2008

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना..

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहा वरी फुले असा शहारा
तुझा इशारा, असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीत गीत गाती
तू ये निशा अशी करे पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा, तुझा निवारा

मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो

मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो

भेट पहिली अपुली घडता
निळी मोहीनी नयनी हसता
उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली रंग उषेचे भरतो

ममस्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला न कळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते करतो

तुझ्या परी तव प्रीतीसरीता
संगम देखून मागे फिरता
हसरी संध्या रजनी होता
नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो
-
गायक :पं. हृदयनाथ मंगेशकर