थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वार्यापावसाची गाज काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वार्यापावसाची गाज काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
गीत | - | मंगेश कुळकर्णी |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | देवकी पंडित, स्वप्नील बांदोडकर |