रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोण्त्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?
सागती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशाः
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!"
माणसांच्या मध्यराञी हिंडणारा सूर्य मीः
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
--- Suresh Bhat
Wednesday, March 26, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment